BMC Budget : अबब! मुंबईच्या वाहतूक नियंत्रणासाठी बीएमसीकडून इतक्या कोटींचं बजेट, किंमत अंबानींच्या घराऐवढी
देशाची आर्थिक राजधानी अशी मुंबई शहराची ओळख आहे. मुंबई महापालिकेनं नुकताच 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला.

BMC Budget : देशाची आर्थिक राजधानी अशी मुंबई शहराची ओळख आहे. मुंबई महापालिकेनं नुकताच 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. बीएमसीकडून पुढील आर्थिक वर्षासाठी तब्बल 74,366 कोटी रुपयांचा आर्थिक संकल्प सादर करण्यात आला आहे. या बजेटमधील तब्बल 5100 कोटींचा निधी हा मुंबईतील वाहतूक विभागासाठी मंजूर करण्यात आला आहे. वाहतूक विभागासाठी बीएमसीकडून जेवढा निधी मंजूर करण्यात आला आहे, तेवढी किंमत सध्या वर्तमानस्थितीमध्ये मुकेश अंबानी यांचा छोटा भाऊ अनिल अंबानी यांच्या घराची आहे. अनिल अंबानी यांचं हे घर मुंबईच्या पाली हिल परिसरात असून या घराची किंमत तब्बल 5000 कोटी रुपये एवढी आहे.
अनिल अंबानी यांच्या ज्या घराची आपण चर्चा करत आहोत ते घर मुंबईच्या पाली हिल परिसरात आहे. या घराला एकूण 17 मजले आहेत. हे घर 16,000 स्केअर फुटाचं आहे. या घरात ओपन स्विमिंग पूल, टेरेस गार्डन आणि जीम आहे. तसेच वाहनांसाठी गॅरेज देखील आहे. अनिल अंबानी यांच्या घराच्या टॉप फ्लोअरवर हेली पॅड देखील आहे. अनिल अंबानीचं घर अतिशय सुंदर पद्धतीनं डिझायन करण्यात आले असून, आत सर्व प्रकारच्या सोई सुविधा उपलब्ध आहेत. घराला सुंदर अशा उंच-उचं काचेच्या खिडक्या आहेत. या घराच्या टॉप फ्लोअरवरून मुंबई शहराचं विहंगम दृश्य पाहाता येतं. या घराची किंमत तब्बल पाच हजार कोटी रुपये इतकी आहे.
दरम्यान बीएमसीकडून अर्थसंकल्प सादर करण्यात आला, पुढील आर्थिक वर्षासाठी तब्बल 74,366 कोटी रुपयांचा आर्थिक संकल्प सादर करण्यात आला आहे. ज्यामध्ये मुंबईच्या वाहातूक विभागासाठी 5100 कोटी रुपयांच्या बजेटला मंजुरी देण्यात आली आहे.या बजेटमध्ये मुंबईतील वाहतूक समस्या कमी करण्याच्या विविध प्लॅनचा देखील समावेश आहे. याशिवाय या बजेटमध्ये दहिसर चेक नाका येथे बांधण्यात येणाऱ्या ट्रान्सपोर्ट अँड कमर्शियल सेंटरचा देखील समावेश आहे. ज्यामध्ये एक हॉटेल 456 बस पार्किंगची जागा आणि 1424 मोटार वाहन पार्किंगची जागा यांचा समावेश करण्यात आला आहे.