‘…तर आज शिवसेना आणि धनुष्यबाण विकला असता’, मुख्यमंत्र्यांचा पुन्हा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते पारोळा येथील प्रचारसभेत बोलत होते.

'...तर आज शिवसेना आणि धनुष्यबाण विकला असता', मुख्यमंत्र्यांचा पुन्हा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
Follow us
| Updated on: Nov 12, 2024 | 8:32 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते पारोळा येथील प्रचारसभेत बोलत होते. सभेत लाडक्या बहिणींची लक्षणीय संख्या आहे, सगळ्यात मोठी सभा आज इथं पारोळ्यात होत आहे. याचा मला आनंद आहे. महाविकास आघाडीच्या बकासुराविरोधात आपण आज सर्व एकत्र आलो आहोत. मला काय मिळालं याचा विचार न करता जनतेला काय मिळालं हे बघणारा नेता म्हणजे चिमणराव पाटील आहेत. ज्यावेळी उठाव झाला त्यावेळी पहिल्या पाच आमदारांमध्ये चिमण आबा हे होते, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

ते पुढे बोलताना म्हणाले की, अन्यायाविरूद्ध पेटून उठणं हे आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलं आहे. शिवसैनिक आणि शिवसेनेचं खच्चीकरण झालं. एकनाथ शिंदेंनी धाडस केलं नसतं तर आज शिवसेना आणि धनुष्यबाणही विकला असता. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आम्ही होतो. ते विकासविरोधी आणि काम बंद पाडणारं सरकार होतं, असा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, आपल्या सरकारनं घरातील वीजबिलावर तीस टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर व्हिजन महाराष्ट्र 29 हे स्थापन करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. शेतकऱ्यांना मदत करणं हे सरकारचं काम आहे. आपण असे अनेक शेतकरी फायद्याचे निर्णय घेतले आहेत. त्यांनी फक्त फसव्या घोषणा दिल्या. गुलाबरावांच्या भाषेत सांगायचं झालं तर टांगा पलटी घोडे फरार, पण आम्ही जे केलं ते बरोबर केलं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

आम्ही एकदा शब्द दिला की पुन्हा मागे फिरत नाहीत, आम्ही लाडक्या बहिणींना देणारे आहोत, हे सरकार देणा बँक आहे. हे सरकार हप्ते घेणारे सरकार नाही तर देणारे सरकार आहे.  एक-दोन नाही तर तब्बल पाच हप्ते आम्ही आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केले आहेत. आमची नियत साप आहे, आम्ही ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पैसे देऊन टाकले, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.