Maharashtra News LIVE : गणेशोत्सवासाठी कोकणवासियांची एसटीला पसंती
Maharashtra Political News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

कल्याण पूर्वेतील खड्ड्यांवर माजी नगरसेवक महेश गायकवाड आक्रमक झाले आहेत. सात दिवसांत रस्ते सुस्थितीत करा, अन्यथा अधिकाऱ्यांना पालिकेत घुसू देणार नाह, त्यांचं विसर्जन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा गायकवाड यांनी दिला आहे. पंढरपूर येथे चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. उजनी आणि वीर धरणातून सोडलेले पाणी एक लाख 95 हजार क्यूसेक्स इतक्या विसर्गाने वाहत आहे. त्यामुळे चंद्रभागा नदीकाठी असलेल्या व्यास नारायण वसाहतीत पाणी घुसल्याने जवळपास 250 कुटुंबांचे स्थलांतर केले आहे. पावसाचा जोर पुण्यात ओसरला असून कमाल तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ झाली आहे. पुण्यात गेल्या 24 तासांमध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे. दरम्यान गणेशोत्सवामध्ये पुण्यात मेट्रोच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या काळात भाविकांची होणारे गर्दी लक्षात घेऊन स्वारगेट ते पिंपरी चिंचवड आणि वानाज ते रामवाडी मार्गावर मेट्रोच्या वेळेत वाढ करण्याचा निर्णय महामेट्रोने घेतला आहे. यासह देश-विदेश, महाराष्ट्र, राजकारण, क्रीडा, मनोरंजन या क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
LIVE NEWS & UPDATES
-
28 किंवा 29 तारखेला मनोज जरांगे पाटील मुंबईत येणार- वीरेंद्र पवार
28 ला किंवा 29 तारखेला सकाळी मुंबईमध्ये मनोज दादा जरांगे पाटील येणार आहेत. पुन्हा एकदा मराठा समाज मुंबईच्या दिशेने निघाला आहे. एवढा मोठा समाज आपला मागण्यासाठी येतोय त्यावेळेस जे सणासाठी जात आहेत. त्यांना आम्ही अडवत नाही आहोत पण जे मुंबईमध्ये असतील किंवा जे मुंबईच्या आजूबाजूच्या भागात राहतात त्यांनी येऊन आमचे साथ द्यावी, असं मराठा समन्वय मुंबई सहयोजक वीरेंद्र पवार यांनी सांगितलं आहे.
-
गणेशोत्सवासाठी कोकणवासियांची एसटीला पसंती
गणेशोत्सवासाठी कोकणवासियांनी एसटीला पसंती दिली आहे. मुंबई, ठाणे,पालघर,विभागातून कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांचा एसटीला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. एसटीच्या ४ हजार ४७९ बसेस गट आरक्षणासह एकूण ५ हजार १०३ ज्यादा बसेस फुल झाल्या आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माहिती दिली.
-
-
बिहार एसआयआर प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात 8 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार
बिहार एसआयआर प्रकरणाची सुनावणी आता 8 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. आज, सर्वोच्च न्यायालयाने बिहारच्या सीईओंना राजकीय पक्षांच्या अध्यक्षांना आणि सरचिटणीसांना या मुद्द्यावर न्यायालयाच्या आदेशावर स्थिती अहवाल दाखल करण्यासाठी नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.
-
नांदेडमध्ये यंदाही पारंपरिक पद्धतीने पोळा सण साजरा
नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील चेनापूर गावात यंदाही पारंपरिक पद्धतीने पोळा सण साजरा करण्यात आला. सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन सलोख्याचा संदेश दिला.
-
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ऑनलाइन गेमिंग विधेयकाला मंजुरी
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज शुक्रवारी ऑनलाइन गेमिंगचा प्रचार आणि नियमन विधेयक, 2025 ला मान्यता दिली आहे.
-
-
ड्रीम इलेव्हन गेमिंग App ची सेवा बंद
मोठी बातमी समोर आली आहे. ड्रीम इलेव्हन गेमिंग App ची सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून कोणत्याही सामन्यावर पैसे लावता येणार नाही. गेमिंग विधेयकानंतर ड्रीम इलेव्हन एप बंद होण्याच्या मार्गावर आहे. ड्रीम इलेव्हनचे 28 कोटी यूझर्स आहेत. तसेच कंपनीचा 9 हजार 600 कोटींचा महसूल बुडाला आहे.
-
सुहास सामंत यांचा बेस्ट कामगार अध्यक्षपदाचा राजीनामा
ठाकरे गटाच्या सुहास सामंत यांनी बेस्ट कामगार अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. बेस्ट पतपेढी निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर सामंत यांनी हा निर्णय घेतला आहे. पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन सामंत यांनी राजीनामा दिलाय.
-
नाशिक-मुंबई महामार्गावर कंटेनर चालकाकडून रश ड्रायव्हिंग
मुंबई नाशिक महामार्गावर एका कंटेनर चालकाने रश ड्रायव्हिंग केल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा कंटेनर नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात होता. शहापूर तालुक्यातील वेहलोली फाट्यावर आल्यानंतर महामार्गावर आडव्या तिडव्या नागमोडी पद्धतीने कंटेनर चालवला. त्यावेळेस कंटेरनच्या मागे असलेल्या वाहनातील चालकाने व्हीडिओ शूट केला.
-
महायुतीच्या सरकारचे नियंत्रण पूर्णपणे हरवले आहे – सचिन सावंत
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी सरकारवर टीका केली आहे. महायुतीच्या सरकारचे नियंत्रण पूर्णपणे हरवले आहे. तिगडंम सरकारचे तिगडांबाजी सुरू आहे. लोकसभेला जे आश्वासन दिले ते आता पूर्ण करणे दिवसांन दिवस कठीण जात आहे. लाडकी बहीण योजना कोलमडून जात आहे त्याचा दुरुपयोग होत आहे, त्याचे फ्रॉड समोर येत आहे. जनतेची फसवणूक होत आहे असं सावंत यांनी म्हटलं आहे.
-
गोंदिया:-भर पावसात गावागावात पोळा सण उत्साहात साजरा
गोंदिया जिल्ह्यात पाऊस सुरु आहे, मात्र भर पावसात गावागावात पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांनी सर्जा-राजा प्रती कृतज्ञता व्यक्त केली. तसेच गोंदिया जिल्ह्यातील कमरगाव येथील शेतकऱ्यांनी सजवलेली बैल जोडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
गोंदिया जिल्ह्यात पावसाची दमदार बॅटिंग
गोंदिया जिल्ह्यात आज दुपारनंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली. गेल्या दोन दिवसापासून ढगाळ वातावरण होतं परंतु पावसाने दमदार हजेरी लावली नव्हती, त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा या आकाशाकडे लागलेल्या होत्या परंतु अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
-
नाशिक: शहरात रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांमुळे ठाकरे गटाची उपरोधक बॅनरबाजी
नाशिकच्या विनय नगर परिसरात गणपती बाप्पा आणि गणपतीचं वाहन उंदीर मध्ये नाशिक शहरातील खड्ड्यांवरून ठाकरे गटाने बॅनरबाजी केली आहे. अनेक वेळा आंदोलन करूनही शहरातील रस्त्यांची परिस्थिती जैसे थी तशीच असल्याने प्रशासनाला जागा करण्यासाठी अनोखी बॅनरबाजी करण्यात आली आहे.
-
रस्ताच्या दुरुस्तीसाठी गोंदियात नागरिकांचं आंदोलन
रस्ताच्या दुरुस्तीसाठी गोंदियात नागरिकांचं आंदोलन
रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी नागरिक उतरले रस्त्यावर
आक्रमक नागरिकांकडून काही काळ रस्तारोको
सात दिवसांत रस्ता दुरुस्त केला नाही, तर करणार आमरण उपोषण, नागरिकांचा इशारा
-
कंत्राटी कामगारांचं ठाणे महापालिकेच्या मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन
कंत्राटी कामगारांचं ठाणे महापालिकेच्या मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन
कोविड काळापासून काम करणाऱ्या कामगारांना ठाणे महानगरपालिकेमध्ये कायम स्वरुपी समाविष्ट करून घेण्याची मागणी
ठाणे महानगरपालिकेमध्ये जी भरती प्रक्रिया राबवली जात आहे त्या मध्ये या कामगारांना कायमस्वरूपी समाविष्ट करून घ्यावे अशी मागणी
-
मुंबईच्या वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी
मुंबईच्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी
गोरेगाव ते विलेपार्लेपर्यंत रस्ता जाम
बोरिवलीहून मुंबईकडे जाणाऱ्या तसेच मुंबईहून बोरिवलीकडे येणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी
वाहनधारकांचे प्रचंड हाल
-
भुजबळ साहेबांना बैठक घेण्याचा अधिकार – गिरीश महाजन
भुजबळ साहेब नाशिकचे साहेब ते सुद्धा मंत्री आहेत, त्यांना कुंभमेळ्याची बैठक घेण्याचा अधिकार आहे असे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.
-
तारापूर येथे वायूगळती प्रकरणात गुन्हा दाखल
पालघर -तारापूर एमआयडीसीमधील मेडले फार्मास्युटीकल कंपनीतील वायूगळतीच्या दुर्घटनेप्रकरणी कारखाना व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
गडचिरोली – रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे लेकराचे शव खाटेवर घेऊन बापाची सात किलोमीटरची पायपीट
रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे आपल्या सहा वर्षाच्या मुलाचे शव खाटावर घेऊन बापाला सात किलोमीटरची पायपीट करावी लागल्याची घटना भामरागड तालुक्यातील कोयार येथे घडली आहे.
-
ठाण्याच्या किसननगरात धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळला
ठाण्याच्या किसननगर – ३ येथील धोकादायक चार मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा काही भाग कोसळला आहे,प्राथमिक माहितीनुसार कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.
-
हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल्ल लोढा अखेर पोलिसांच्या ताब्यात
पुणे-हनी ट्रॅप आणि लैंगिक अत्याचार प्रकरणात सतत चर्चेत असलेला प्रफुल्ल लोढा अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. बावधन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर लैंगिक अत्याचार प्रकरणात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्याला ऑर्थर रोड जेलमधून ताब्यात घेतले आहे. आज सकाळी ही कारवाई करण्यात आली.
-
होमगार्ड महिलेच्या हत्या प्रकरणातील आरोपीला अटक
बीडमधील होमगार्ड अयोध्या व्हरकटे या गेल्या काही दिवसांपूर्वी बेपत्ता असल्याची तक्रार बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. यावरून पोलिसांनी शोध घेतला असता त्यांचा मृतदेह बीड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत आढळून आला. यानंतर तिचीच मैत्रीण वृंदावनी फरताळे हिची चौकशी केली असता तिनेच ही हत्या केल्याचं स्पष्ट झालं. हत्येनंतर मुलाच्या मदतीने तिचा मृतदेह एका नाल्यात फेकून दिला आणि विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. यावरून पोलिसांनी आरोपी वृंदावनी फरताळे हिला अटक केली असून आज न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.
-
दारूबंदीसाठी महिला सरसावल्या
गोंदिया परिसरात दारूबंदीसाठी महिला सरसावल्या आहेत. कारवाई न झाल्यामुळे पोलीस निरीक्षकाना भेटत कारवाईची केली मागणी केली आहे. पोलिसांनी कारवाई न केल्यास महिला दारू विक्रेतांविरुद्ध एल्गार करणार.
-
भाईंदरमध्ये दुकानदाराने प्लास्टिक पिशव्यांचा वापर केल्याने दंड
भाईंदरमध्ये औषध दुकानदाराने प्लास्टिक पिशव्यांचा वापर केल्यामुळे ५ हजार रुपयांचा दंड ठेठावण्यात आला आहे. दंड तत्काळ भरता न आल्याने महापालिकेच्या स्वच्छता पथकाने थेट दुकानातील फ्रीज केला जप्त. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून व्हायरल झाला आहे.
-
पोलीस उपनिरीक्षक संदेश राणे निलंबित
वालीवचे पोलीस उपनिरीक्षक संदेश राणे यांना पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. जमीन बळकविण्यासाठी मूळ मालकावर खोटा गुन्हा दाखल करून, दुसऱ्या व्यवसायिकांचा बेकायदेशीर ताबा मिळवून दिला असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
-
महिला सुरक्षेबाबत चर्चा झाली – देवेंद्र फडणवीस
महिला सुरक्षेबाबत चर्चा झाली. शासनाच्यावतीने केलेल्या उपायोजना मांडल्या. महिलांशी संबंधित विविध प्रश्नांवर चर्चा झाली. उपराष्ट्रपतीपदाबाबत ठाकरेंशी फोनवरुन चर्चा केली, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
-
अंजली दमानिया यांचा नवीन दावा
“कृषीमंत्री असताना एक प्रचंड मोठा कृषी घोटाळा हा धनंजय मुंडे यांनी केला होता आणि कृषी सचिव तेव्हा वीराधा नावाच्या होत्या त्यांनी त्याचा एक अहवाल बनवून मंत्र्यांकडे पाठवला आणि तो पाठवल्याबरोबर ती फाईल परत कधीच आली नाही त्यांनी इतकच नाही तर त्याचवेळी राधांची तडकाफडकी बदली करण्यात आली आणि हे सगळं 14 ऑगस्ट 2024 ला रिपोर्ट देखील झालं होतं” असा दावा अंजली दमानिया यांनी केला.
-
मुलाचा वडिलांवर चाकूने खुनी हल्ला
मुलाचा वडिलांवर चाकूने खुनी हल्ला. हल्ल्यात वडील गंभीर जखमी. शिरूर तालुक्यातील निमगाव भोगी येथील घटना. आईला दमदाटी करून शिवीगाळ करत असताना वडील समजावून सांगण्यासाठी गेले असता केला हल्ला. रांजणगाव पोलिस ठाण्यात मुलाविरोधात गुन्हा दाखल. सुहास चंद्रकांत शेवाळे असे हल्ला करणाऱ्या मुलाचे नाव. रांजणगाव पोलिसांनी आरोपी मुलाला केली अटक.
-
जळगावात कोणी घेतला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ?
जळगाव जिल्ह्यात एका ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचा समोर आले. एकनाथ चुडामण कोळी असे त्याचे नाव असून मुक्ताईनगर तालुक्यातील एका ग्रामपंचायतीचा तो ग्रामसेवक असल्याची माहिती समोर आली आहे तसेच जळगाव जिल्हा परिषदेच्या सात महिला कर्मचाऱ्यांनी देखील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आहे.
-
पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन
पुरंदर विमानतळ बाबत राज्य सरकारने हा विमानतळ करण्याचे निर्णय घेतला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. काही गावांमध्ये १२८५ एकर जमीन भूसंपादन सहमती पत्र सादर करण्याकरिता सूचना देऊन अंमलबजावणी सुरू करतील.काही लोकांचा विरोध आहे चर्चेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करू, असे पवार म्हणाले.
-
नंदुरबारमध्ये रिमझिम
नंदुरबार जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची रिमझिम सुरू आहे. नंदुरबार जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे पिकांना चांगला फायदा होणार आहे. जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून पावसाने विश्रांती घेतली होती त्यामुळे पीक धोक्यात आले होते.
-
नांदूर मधमेश्वर धरणातून पूर पाण्याचा विसर्ग
नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असताना नांदूर मधमेश्वर धरणातून पूर पाण्याचा विसर्ग सलग दुसऱ्या दिवशी कायम होता. आठ वक्रकार गेटमधून 45 हजार 766 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
-
कचरा उचलण्याचे पालिकेसमोर आव्हान
वसई विरार मधील अतिवृष्टी ने साचलेले पाणी आता अनेक ठिकाणचे ओसरले आहे. मात्र आता पूर परिस्थितीने साचलेली दुर्गंधी, कचरा उचलण्याचे पालिकेसमोर मोठे आव्हान आहे. पालिकेचे स्वच्छता दूत सकाळ पासून फिल्ड वर असून, साचलेला कचरा, पसरलेली दुर्गंधी साफ करत आहेत
-
गणेशोत्सव काळात मेट्रोच्या वेळेत वाढ
गणेशोत्सव काळात मेट्रोच्या वेळेत वाढ करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. मेट्रो या काळात सकाळी 6 वाजता ते रात्री 2 वाजेपर्यंत चालणार आहे. कायदा आणि सुव्यवस्थेवर लक्ष ठेवण्यात येणार आहे
-
काहीतरी गैरसमज झाला-छगन भुजबळ
लक्ष्मण हाके यांचा माळी समाजाविषयीचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. सकाळी दोन तीन वेळा फोन आले. काहीतरी गैरसमज झाले आहेत. ते म्हणाले खुलासा करणार आहे. मी सुद्धा सांगितले यावर कॉमेंट करायची नाही, असे भुजबळ म्हणाले.
-
रामदास आठवलेंची ती कविता व्हायरल
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची झाली युती, मात्र बेस्टच्या निवडणुकीत झाली त्यांची माती. राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीवर रामदास आठवले यांची त्यांच्या शैलीत टीका केली.
-
मनोज जरांगे पाटील यांना मुंबई जाण्याची वेळी येऊ देऊ नका, मराठा कार्यकर्त्यांची रामदास आठवले यांच्याकडे मागणी
मनोज जरांगे पाटील यांना मुंबई जाण्याची वेळी येऊ देऊ नका, मराठा कार्यकर्त्यांची रामदास आठवले यांच्याकडे मागणी… मराठा आरक्षण प्रश्नावर हैदराबाद गॅजेट लागू करण्यासाठी तात्काळ मुख्यमंत्र्यांची भेट घेत निर्णय घ्या अशी मागणी… रामदास आठवले यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना याबाबत भेटणार असल्याचं मराठा कार्यकर्त्यांना आश्वासन… मराठा आरक्षण प्रश्नावर धाराशिव जिल्हा दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय सामाजिक व न्याय मंत्री रामदास आठवले यांची मराठा कार्यकर्त्यांनी घेतली भेट…
-
जळगावात चक्क एक मुस्लिम कारागीर गणेश मूर्तींना रंगकाम करत असल्याचे अनोखे दृश्य पाहायला मिळत आहे
रहीम शेख असे या रंगकाम करणाऱ्या मुस्लिम कारागिरांचे नाव असून मुस्लिम असताना सुद्धा तब्बल 40 वर्षांपासून ते हे काम करत आहे… गणेशोत्सवामध्ये गणेश मूर्ती तर नवरात्रीमध्ये देवीच्या मूर्तींनासुद्धा रहीम शेख हे रंगकाम करत असल्याचे त्यांनी सांगितलं…. उत्सवाव्यतिरिक्त हिंदू धर्माबरोबरच वेगवेगळ्या दरम्यानच्या मंदिरांमध्ये जाऊन त्यांच्या देवी-देवतांना रंगकाम करून आकर्षक बनवण्याचं काम देखील रहीम शेख करत असतात…
-
ठाकरेंच्या शिवसेनेनं सुदर्शन रेड्डींना पाठिंबा दिलेला आहे – संजय राऊत
ठाकरेंच्या शिवसेनेनं सुदर्शन रेड्डींना पाठिंबा दिलेला आहे… आम्ही हुकूमशाहीविरोधात लढण्याची ठाम भूमिका घेतली आहे… आम्हाला आलेल्या फोनकडे आम्ही शिष्टाचार म्हणून पाहतो… तुम्ही जे पक्ष फोडले, त्यात पक्षांकडे मत का मागताय? असं वक्तव्य देखील राऊत यांनी केलं आहे.
-
सांगलीच्या कृष्णेची पातळी हळूहळू होतेय कमी
सांगलीच्या कृष्णेची पातळी हळूहळू कमी होत आहे. मात्र इशारा पातळी 40 आहे आणि कृष्णेची पातळी अध्याप ही 42 फूट असल्याने शहरातील नागरी वस्ती मधील सखल भागात पाणी अजून साचून आहे. शहरातील सूर्यवंशी प्लॉट, मगरमच्छ कॉलनी, काकानगर, ट्रक अड्डा, ईदगाह परिसर येथे पाणी साचलं आहे…
-
प्रांजल खेवलकरवर आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता…
अनेक महिला तक्रारदार पोलिसांच्या संपर्कात… प्रांजल खेवलकरंशी संबंध आलेल्या महिला भयभीत झाल्या आहेत… सहमती नसताना महिलांचे आक्षेपार्य फोटो काढले आहेत… ते पोलिसांना सापडले आहेत… काही महिलांचे जबाब घेण्याचे काम सुरु असल्याची माहिती…
-
एसटी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावणार ? या महिन्यात लवकर पगार होणार ?
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना देखील पुढील महिन्याचा पगार गणपती आधी मिळावा यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश. आजच्या आज वित्त मंत्रालयाकडे कर्मचारी पगाराची फाइल सादर करण्याचे दिले अधिकाऱ्यांना आदेश
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात बैठक
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडतेय. या बैठकीला विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पुणे महापालिका आयुक्त,पुणे पोलीस आयुक्त, पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्त सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित आहेत.
-
शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळींची भाजपच्या नवनाथ बन यांच्यावर टीका
मुंबई, महाराष्ट्रात आलेल्या पुरात भाजपच्या गोटात कचरा वाहून आलाय. पुरात वाहून आलेला नवनाथ बन हा सारडा खूप बोलायला लागला आहेय उद्धव ठाकरे, संजय राऊतांवर बोलण्याची शेंबड्या नवनाथ बन तुझी लायकी काय आहे रे
-
रेती चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या सगीर अन्सारी अजित दादाच्या राष्ट्रवादीत
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत यवतमाळ अल्पसंख्याक आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदाची दिली जबाबदारी. सगीर अन्सारी जिल्ह्यात रेती माफिया म्हणून ओळख अनेक गुन्हे त्याच्या शिरावर असताना राजकीय राजाश्रय घेण्यासाठी. पक्षातील काही नेत्यांनी नियुक्तीवर आक्षेप घेतल्याची माहिती
-
शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळींची भाजपच्या नवनाथ बन यांच्यावर टीका
शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी भाजपच्या नवनाथ बन यांच्यावर टीका केली आहे.
मुंबई, महाराष्ट्रात आलेल्या पुरात भाजपच्या गोटात कचरा वाहून आला आहे, पुरात वाहून आलेला नवनाथ बन हा सारडा खूप बोलायला लागला आहे. उद्धव ठाकरे, संजय राऊतांवर बोलण्याची ,शेंबड्या नवनाथ बन तुझी लायकी काय आहे रे अशी टीका करण्यात आली आहे.
-
दिल्लीतील भटक्या श्वानांप्रकरणी सुप्रीम कोर्ट आज देणार निकाल
दिल्लीतील भटक्या श्वानांप्रकरणी सुप्रीम कोर्ट आज निकाल देणार आहे. 3 न्यायमूर्तींच्या विशेष खंडपीठाने 14 ऑगस्टला निकाला राखून ठेवला होता. दिल्ली- NCR मधील भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये पाठवा, 11 ऑगस्ट्ला सुप्रीम कोर्टाच्या दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने हे निर्देश दिले आहेत.
तसेच या कामामध्ये अडथळा आणणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही कोर्टाने दिला होता. कोर्टाच्या निकालानंतर काही सामाजिक संघटनांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
-
मोनोरेल पुन्हा झाली ओव्हरलोड, 50 प्रवाशांना खाली उतरवलं
मोनोरेल पुन्हा एकदा ओव्हरलोड झाली आहे, त्यामुळे 50 प्रवाशांना खाली उतरवलं. आठवडाभरात मोनोरेल ओव्हरलोड होण्याची ही दुसरी घटना आहे. आचार्य अत्रे स्थानकातून निघालेली मोनोरेल ओव्हरलोड झाली, अखेर काही प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं.
-
पुण्याच्या खेड तालुक्यातील चास कमान धरणातून भीमा नदीपात्रात मोठा विसर्ग सुरू
पुण्याच्या खेड तालुक्यातील चास कमान धरणातून भीमा नदीपात्रात मोठा विसर्ग सुरू आहे. या विसर्गामुळे चास-कडूस-टोकेवाडी दरम्यानचा भीमा नदीवरील पूल पाण्याखाली गेला असून पुलावरून पाणी वाहत आहे. तरीसुद्धा काही वाहनचालक दुचाकी व चारचाकी वाहने धोकादायकरीत्या या पुलावरून नेण्याचा प्रयत्न करत आहेत.
त्यामुळे अपघातांची शक्यता वाढली असून नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असा इशारा देण्यात आला आहे.
-
पुण्यात पावसाचा जोर ओसरला
पुण्यात पावसाचा जोर ओसरला असून खडकवासला धरणातून विसर्ग कमी झाला आहे. चार दिवसानंतर पुण्यातील बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी खुला होणार.
खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात सध्या 12000 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू.
-
पंढरपूरच्या चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ, गोपाळपूर येथील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प
पंढरपूरच्या चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. उजनी आणि वीर धरणातून सोडलेले पाणी एक लाख 95 हजार क्यूसेक्स इतक्या विसर्गाने वाहत आहे. त्यामुळे चंद्रभागा नदीकाठी असलेल्या व्यास नारायण वसाहतीत पाणी घुसल्याने जवळपास 250 कुटुंबांचे स्थलांतर केले आहे. पंढरपूर मंगळवेढा मार्गावरील गोपाळपूर येथील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
Published On - Aug 22,2025 8:00 AM
