
लग्नानंतर खुद्द सोनाक्षी हिने आयुष्यातील खास क्षणांची झलक सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. अभिनेत्रीने लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांनी दोघांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

पती झहीर याच्यासोबत फोटो पोस्ट करत अभिनेत्री कॅप्शनमध्ये म्हणाली, 'आजचा दिवस खास आहे... सात वर्षांपूर्वी याच दिवशी आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. प्रेम एक सुंदर भावना आहे आणि तेव्हाच ठरवलं की आता आयुष्यभर सोबत राहायचं...'

'या प्रेमाने अनेक संकटांचा सामना केला आहे. आज आम्ही दोघे या क्षणात आहोत... आमच्या दोन्ही कुटुंबियांच्या शुभेच्छा आणि दोन्ही देवांचे आशीर्वाद असल्यामुळे प्रवास लग्नापर्यंत पोहोचला आहे. आम्ही पती - पत्नी झालो आहोत... सोनाक्षी - झहीर - 23.06.2024' अशा भावना अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.

सांगायचं झालं तर, गेल्या सात वर्षांपासून सोनाक्षी - झहीर एकत्र आहेत. दोघांच्या नात्याची सुरुवात 23.06.2017 मध्ये झाली होती. दोघांच्या नात्यात अनेक चढ - उतार आले पण दोघांनी मिळून सर्व संकटांचा सामना केला.

लग्नापूर्वी सिन्हा कुटुंबियांमध्ये नाराजीचं वातावरण आहे... अशी चर्चा रंगली होती. अभिनेते शत्रुघ्न सिन्हा देखील 'आताची मुलं ऐकत नाही... आई - वडिलांना काही सांगत नाही...' असं वक्तव्य केलं होते.