AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup : सलग दोन पराभवानंतरही पाकिस्तान सुपर 8 फेरी गाठणार! कसं ते गणित समजून घ्या

टी20 स्पर्धेतील साखळी फेरीतील लढती आता अंतिम टप्प्यात येत आहेत. सुपर 8 फेरीचं चित्र आता स्पष्ट होताना दिसत आहे. भारत अ गटात असून अमेरिका, पाकिस्तान, कॅनडा आणि आयर्लंड हे संघ आहेत. त्यात भारत आणि अमेरिका सोडलं तर इतर देशांचं सुपर 8 फेरी गाठणं कठीण आहे. असं असूनही पाकिस्तानला सुपर 8 फेरीची संधी आहे. कसं ते समजून घ्या

| Updated on: Jun 10, 2024 | 1:12 PM
Share
टी20 वर्ल्डकप स्पर्धा सुरु होण्यापू्र्वी पाकिस्तानने आर्मी ट्रेनिंग केलं. तसेच विजयाचे धडे गिरवले. जेतेपदासाठी प्रबळ दावेदार म्हणूनही चर्चा रंगली. मात्र प्रत्यक्षात मैदानात उतरल्यानंतर पाकिस्तानी संघाचा रंग उडून गेला. अमेरिकेनंतर भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली.

1 / 6
पाकिस्तानला साखळी फेरीतील सलग दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे आता सुपर 8 फेरीचं गणित खूपच किचकट झालं आहे. उर्वरित दोन सामन्यात पाकिस्तानला काहीही करून विजय मिळवावा लागणार आहे.

पाकिस्तानला साखळी फेरीतील सलग दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे आता सुपर 8 फेरीचं गणित खूपच किचकट झालं आहे. उर्वरित दोन सामन्यात पाकिस्तानला काहीही करून विजय मिळवावा लागणार आहे.

2 / 6
पाकिस्तानला सुपर 8 फेरीचं गणित सोडवायचं असेल तर उर्वरित दोन सामन्यात विजय मिळवून चालणार नाही. तर इतर संघांच्या कामगिरीकडेही लक्ष द्यावं लागेल. अमेरिका आणि भारताने दोन पैकी एक सामना जिंकला की पाकिस्तानचा पत्ता कट होईल.

3 / 6
टीम इंडियाचा पुढचा सामना 12 जून रोजी अमेरिकेशी होणार आहे. या सामन्यात विजयी होणारा संघ थेट सुपर 8 फेरी गाठणार आहे. तर एका संघाला एका विजयाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. जर या दोन पैकी एका संघाचा उर्वरित दोन पैकी दोन सामन्यात पराभव झाला तर पाकिस्तानला संधी आहे.

4 / 6
भारताचे पुढील दोन सामने अमेरिका आणि कॅनडाशी आहेत. तर अमेरिकेचे पुढील दोन सामने भारत आणि आयर्लंडशी आहेत. पाकिस्तानचे पुढील दोन सामने कॅनडा आणि आयर्लंडशी होणार आहे. या दोन्ही सामन्यात पाकिस्ताने मोठ्या फरकाने विजय मिळवला तर 4 गुण आणि नेट रनरेटच्या जोरावर सुपर 8 फेरी गाठू शकेल.

5 / 6
पाकिस्तानचा टी20 वर्ल्डकपचा पुढचा प्रवास आता अमेरिकेच्या हाती आहे. कारण भारताची विजयी घोडदौड पाहता दोन पैकी एका सामन्यात आरामात विजय मिळवेल. त्यामुळे अमेरिकेचा उर्वरित दोन्ही सामन्यात पराभव झाला तर पाकिस्तानला संधी आहे. 14 जून रोजी पाकिस्तानचं पुढच्या प्रवासाचं गणित स्पष्ट होईल.

6 / 6
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.