भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसेंची पुन्हा चौकशी होणार? मला नाउमेद करण्यासाठीच चौकशीचा प्रकार, खडसेंची टीका

एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिलीय, मला नाउमेद करण्यासाठी हा चौकशीचा प्रकार सुरु आहे. नाथाभाऊ हा राजकीय दृष्ट्या अडचणीचा असल्याने चौकशीची मागणी होत असल्याची टीका खडसेंनी केलीय.

भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसेंची पुन्हा चौकशी होणार? मला नाउमेद करण्यासाठीच चौकशीचा प्रकार, खडसेंची टीका
एकनाथ खडसे, नेते, राष्ट्रवादी काँग्रेसImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jul 30, 2022 | 6:51 PM

जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना मोठा झटका दिलाय. खडसे यांच्यावर आरोप असलेल्या भोसरी भूखंड घोटाळा (Bhosri Land Scam) प्रकरणी पुणे लाचलुचपत विभागानं घोटाळ्याची पुन्हा चौकशी करण्याच्या मागणीसाठी आज न्यायालयात तपास करण्याच्या मागणीसाठी अर्ज (Application) सादर केला आहे. याबाबत न्यायालयाने 26 ऑगस्ट ही तारीख पुढील सुनावणीसाठी दिलीय. आता 26 तारखेला न्यायालय काय आदेश देणार हे पाहावं लागणार आहे. त्यावर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिलीय, मला नाउमेद करण्यासाठी हा चौकशीचा प्रकार सुरु आहे. नाथाभाऊ हा राजकीय दृष्ट्या अडचणीचा असल्याने चौकशीची मागणी होत असल्याची टीका खडसेंनी केलीय.

’40 वर्षाच्या राजकीय जीवनात कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार केला नाही’

भोसरी प्रकरणाबाबत अनेकदा चौकशी झाली आहे. झोटिंग समितीनेही चौकशी केली आहे. पुण्याच्या अँटी करप्शन विभागानं चौकशी करुन या प्रकरणात तथ्य नाही. हे प्रकरण बंद करण्यासाठी न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दिलाय. ईडीकडून आता या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. मला नाउमेद करण्यासाठी हा चौकशीचा प्रकार सुरु आहे. नाथाभाऊ हा राजकीयदृष्ट्या अडचणीचा असल्याने चौकशीची मागणी होते. नाथाभाऊ बाजूला झाला म्हणजे यांना रान मोकळं होईल. वारंवार छळण्याचा हा प्रकार आहे. या गोष्टीचा मी निषेध करतो. जनता हे सर्व पाहत आहे. भोसरी प्रकरणात माझा काहीही संबंध नाही. मी 40 वर्षाच्या राजकीय जीवनात कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार केलेला नाही. चुकीचं काम केलेलं नाही. भोसरी प्रकरणाची चौकशी कोणत्याही यंत्रणेने केली तरी काहीही तथ्य निघणार नाही, असा दावा एकनाथ खडसे यांनी केलाय.

‘राज्यपालांनी अशाप्रकारे भेदभाव करणं योग्य नाही’

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबतही एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिलीय. राजपालांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं अत्यंत दुर्दैवी आहे. या देशाच्या विकासात, व्यापारात सर्वाचं योगदान आहे. राज्यपालांनी अशाप्रकारे भेदभाव करणं, जातीजातीत तणाव निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण करणं दुर्दैवी आहे. महामहिम राज्यपालांकडून अशी अपेक्षा नाही. ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या दृष्टीने बोलायला हवं. हा एकप्रकारे मराठी माणसाचा अवमान आहे. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यामुळे राज्यपालांनी हे आपलं व्यक्तिगत मत आहे, असं स्पष्ट करायला हवं, असंही खडसे म्हणाले.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.