AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Australia 2020 | आधी दणदणीत पराभव, मग दंड, कर्णधार विराटसह टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंना आयसीसीचा दणका

टीम इंडियाकडून ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या सामन्यात झालेल्या चुकीसाठी आयसीसीने हा दंड ठोठावला आहे.

India vs Australia 2020 | आधी दणदणीत पराभव, मग दंड, कर्णधार विराटसह टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंना आयसीसीचा दणका
| Updated on: Nov 28, 2020 | 6:35 PM
Share

सिडनी : पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा (India Tour Australia 2020) 66 धावांनी पराभव केला. या विजयासह 3 सामन्यांचा मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-0 अशी आघाडी घेतली. तर टीम इंडिया पिछाडीवर पडली. टीम इंडियाला या विजयासह दुहेरी दणका बसला आहे. आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय किक्रेट परिषदेने (International Cricket Council) टीम इंडियाचा कर्णधार आणि सर्व खेळाडूंना दंड लगावला आहे. आयसीसीने टीम इंडियाला स्लो ओव्हर रेटमुळे (Slow Over Rate) हा दणका दिला आहे. आयसीसीने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. india vs australia 2020 team india players have been fined for not maintaining a slow over-rate in first odi match against australia

आयसीसीने भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला त्याच्या एकूण मानधनाच्या 20 टक्के इतका दंड लगावला आहे. नियमांनुसार 50 ओव्हर टाकण्यासाठी निर्धारित वेळेची मर्यादा असते. मात्र टीम इंडियाकडून या वेळेच्या मर्यादेचं उल्लंघन झालं. टीम इंडियाला 50 ओव्हर टाकण्यासाठी वेळेपेक्षा अधिक वेळ लागला. यामुळे कर्णधार विराटसह इतर सर्व खेळाडूंना मानधनाच्या 20 टक्के दंड लगावण्यात आला.

अनुच्छेद 2.22 नुसार दंडात्मक कारवाई

कर्णधार विराट आणि इतर खेळाडूंवर आयसीसीसीच्या आचार संहितेतील अनुच्छेद 2.22 नुसार ही दंडात्मक कारवाई केली आहे. अनुच्छेद 2.22 हे स्लो ओव्हर रेट संदर्भात आहे. या नियमात खेळाडूंना मानधनाच्या 20 टक्के इतंक दंड लगावण्याची तरतूद आहे. कर्णधार म्हणून विराटने आपल्याकडून ही चूक झाल्याचं मान्य केलं आहे. त्यामुळे या प्रकरणी कोणतीही सुनावणी केली जाणार नाही.

ऑस्ट्रेलियाकडून 66 धावांनी पराभव

पहिल्या सामन्यात टीम इंडियाला 66 धावांनी पराभूत व्हावे लागले. टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने फंलदाजीचा निर्णय घेतला. अॅरॉन फिंच आणि स्टीव्ह स्मिथ या दोघांनी शतकी खेळी केली. या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला 375 धावांचं तगडं आव्हान दिलं. विजयी आव्हानाचं पाठलाग करताना टीम इंडियाकडून शिखर धवन आणि हार्दिक पांड्या या दोघांनी झुंजार खेळी अपयशी ठरली. टीम इंडियाला 50 ओव्हरमध्ये 308 धावाच करता आल्या. दरम्यान दुसरा एकदिवसीय सामना हा 29 नोव्हेंबरला सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळण्यात येणार आहे. हा सामना भारतासाठी ‘करो या मरो’चा असणार आहे.

संबंधित बातम्या :

हार्दिक पांड्याचा टीम इंडिया आणि कर्णधार कोहलीला मोठा धक्का, म्हणाला, ‘दुसरा ऑलराऊंडर शोधा’

India vs Australia 2020 | कुगं फु पांड्या ! हार्दिकची झुंजार खेळी, विक्रमाला गवसणी

India vs Australia 2020 | कांगारुनी धू धू धुतला, फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या नावे नकोसा विक्रम

india vs australia 2020 team india players have been fined for not maintaining a slow over-rate in first odi match against australia

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.