एका वेफरची किंमत आहे 1 लाख 90 हजार रूपये!, चिप्सच्या मालकाने किमतीच्या कारणांचा वाचला पाढा!

एका वेफरची किंमत आहे 1 लाख 90 हजार रूपये!, चिप्सच्या मालकाने किमतीच्या कारणांचा वाचला पाढा!

मुंबई : वेफर्स… अनेकदा काही हलकं फुलकं आणि चटपटीत खायचं असेल तर वेफर्स हा पर्याय निवडला जातो. संध्याकाळची हलकी भूक असो किंवा प्रवासातील सोबती केवळ वेफर्सला (Wafer) पसंती दिली जाते. वेफर्स हे सर्वसामान्यांच्या खिश्याला परवडणारं आणि जिभेची चटक भागवणारं खाद्य… अगदी पाच-दहा रुपयात वेफर्स मिळतात. पण सध्या एका वेफर्सची किंमत सध्या सोशल मीडियावर चर्चेत (Viral […]

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

May 12, 2022 | 11:23 AM

मुंबई : वेफर्स… अनेकदा काही हलकं फुलकं आणि चटपटीत खायचं असेल तर वेफर्स हा पर्याय निवडला जातो. संध्याकाळची हलकी भूक असो किंवा प्रवासातील सोबती केवळ वेफर्सला (Wafer) पसंती दिली जाते. वेफर्स हे सर्वसामान्यांच्या खिश्याला परवडणारं आणि जिभेची चटक भागवणारं खाद्य… अगदी पाच-दहा रुपयात वेफर्स मिळतात. पण सध्या एका वेफर्सची किंमत सध्या सोशल मीडियावर चर्चेत (Viral News) आहे. एका ई-कॉमर्स वेबसाइटवर फक्त एक वेफर एक लाख 90 हजारांना विकलं जात आहे.

1 लाख 90 हजार रूपये किमतीचा वेफर

ई-कॉमर्स वेबसाइटवर फक्त एक वेफर £2,000 म्हणजेच 1 लाख 90 हजार रूपयांना विकलं जातंय. चिप्सचा एक तुकडा eBay वर तब्बल £2,000 मध्ये विक्रीसाठी आहे. ही किंमत खूपच जास्त असल्याने याची जोरदार चर्चा होतेय.

एवढ्या किमतीचं कारण काय?

या वेफरच्या मालकाने या वेफरच्या किमतीचं कारण सांगितलं आहे. त्याचा असा विश्वास आहे की, “हे चिप्स कुरकुरीत आणि आकाराने फारच दुर्मिळ आहेत. या चिप्समध्ये आंबट मलई आणि कांद्याची चव आहे. हा वेफर काठावर दुमडलेला आहे. त्यामुळे तो कुरकुरीत आहे. सध्या या वेफरची आणि त्याच्या किमतीची जोरदार चर्चा आहे.”

हाय वाईकॉम्बे, बकिंगहॅमशायर, बकिंगहॅमशायर येथील दुकानदाराने दावा केला की हे चिप्स अगदीच नवीन, न वापरलेले, न उघडलेले आहे. विशेष म्हणजे, eBay वर फोल्ड केलेले चिप्स विकणारा तो एकमेव व्यक्ती नाही. काही लोक अगदी कमी किमतीत विकत आहेत. Reddit मध्ये एक विक्रेता फक्त £50 मध्ये आंबट मलई आणि कांद्यासह दोन चिप्स देत आहे. तर मँचेस्टरमध्ये, हनी ग्लेझ्ड हॅम फ्लेवर्ड वेफर्स समान किंमतीला उपलब्ध आहे, डिलेव्हरी चार्जेस£15 सह. त्यामुळे सध्या या वेफर्सची सोशल मीडियावर चर्चे होतेय.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें