या सरकारी योजना एफडीपेक्षा देतात जास्त व्याज, जाणून घ्या टॉप गुंतवणूक योजना

बँकांच्या फिक्स्ड डिपॉझिट (FD) योजनेतील कमी व्याजदरांमुळे, बरेच गुंतवणूकदार आता इतर योजनांचे पर्याय शोधत आहेत. तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक करण्यासाठी आम्ही तीन सुरक्षित सरकारी योजनांविषयी माहिती येथे आम्ही देत आहोत.

| Updated on: Mar 07, 2026 | 10:15 PM
1 / 7
आजही भारतात फिक्स्ड डिपॉझिट (FD) ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक योजना मानली जाते, कारण यात पैसे गमावण्याचा धोका खूप कमी असतो. मात्र, गेल्या काही वर्षांत FD चे व्याजदर कमी असल्याने, अनेक गुंतवणूकदार जास्त परताव्यासाठी इतर पर्याय शोधत आहेत. अनेक लोक जादा नफ्याच्या आशेने रिस्क घेतात. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की काही सरकारी योजना अशा आहेत ज्या FD पेक्षा जास्त परतावा देतात आणि सुरक्षित देखील आहेत. चला अशा ३  सरकारी योजनांची माहिती घेऊयात.ज्या जास्त व्याज आणि सुरक्षा दोन्ही देतात.

2 / 7
एनपीएस: नॅशनल पेन्शन सिस्टम (एनपीएस) ही सरकारी निवृत्ती योजना आहे. या योजनेत गुंतवलेले पैसे सरकार बाँड आणि शेअर बाजारात गुंतवत असते, ज्यामुळे  दीर्घकाळात चांगला परतावा मिळू शकेल.

3 / 7
या योजनेतील गुंतवणुकीचा एक भाग निवृत्तीनंतर पेन्शन म्हणून ठेवला जातो. तुम्ही वयाच्या ६० व्या वर्षानंतर पैसे काढू शकता, तर खाते ७० ते ७५ वयोगटापर्यंत चालू राहू शकते. निवृत्तीनंतरच्या नियोजनासाठी एनपीएस हा एक विश्वासार्ह पर्याय मानला जातो. साधारणपणे, ही योजना सुमारे ८% पर्यंत परतावा देऊ शकते आणि कर बचतीचे फायदे देखील देते.

4 / 7
आरबीआय फ्लोटिंग रेट सेव्हिंग्ज बॉन्ड्स (आरबीआय एफआरएसबी): जर तुमची दीर्घकाळ थांबायची तयारी नसेल आणि सुरक्षितपणे जास्त व्याज मिळवायचे असेल, तर आरबीआय फ्लोटिंग रेट सेव्हिंग्ज बॉन्ड्स हा एक चांगला पर्याय ठरु शकतो. ही देखील पूर्णपणे सरकारी योजना असल्याने, जोखीम खूप कमी असते.

5 / 7
आरबीआय फ्लोटिंग रेट सेव्हिंग्ज बॉन्ड्सवर सध्या ८.०५% पर्यंत व्याज मिळते. त्याचा व्याजदरात दरवर्षी चढ-उतार होत असतो, त्यामुळे बाजारातील परिस्थितीनुसार तो बदलू शकतो. गुंतवणूकदार हे बॉन्ड्स आरबीआय रिटेल डायरेक्ट प्लॅटफॉर्मद्वारे सहजपणे खरेदी करू शकतात. सुरक्षेच्या दृष्टीने, हा एफडीइतकाच सुरक्षित पर्याय आहे, मात्र व्याजदर अनेकदा एफडीपेक्षा जास्त मिळू शकतो.

6 / 7
एनएससी: राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी) ही देखील सरकारद्वारे ऑफर केलेली एक लोकप्रिय बचत योजना आहे. बरेच लोक दीर्घकालीन सुरक्षित गुंतवणुकीसाठी या योजनेचा पर्याय निवडतात.

7 / 7
या योजनेचा मॅच्युरिटी काळ साधारणपणे ५ वर्षांचा असतो आणि त्यावर सुमारे ७.७% व्याजदर मिळतो. सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे एनएससीमध्ये केलेली गुंतवणूक आयकर कलम ८० सी अंतर्गत कर बचतीसाठी देखील विचारात घेतली जाते. तुम्ही या योजनेत केवळ १,००० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता, त्यामुळे लहान गुंतवणूकदारांसाठीही हा एक सोपा आणि सुरक्षित पर्याय आहे.

Follow Us