Mumbai APMC : बटाटा उत्पादकांना अच्छे दिन..! आषाढीच्या तोंडावर महिन्याची आवक तीन दिवसांमध्ये, दराचे काय ?

| Updated on: Jul 10, 2022 | 10:07 AM

बटाटा हे बारामाही बाजारात असते. मात्र, आषाढी वारीच्या दिवशी उपासामुळे बटाट्याच्या मागणीत वाढ होते. यंदा तर दरवर्षीपेक्षा वाढ मागणी वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळेच तीन दिवसांमध्ये व्यापाऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात बटाट्याची खरेदी केली होती. मोठ्या प्रमाणात खरेदी करुन देखील दिवसाकाठी 50 ते 55 गाड्यातील बटाट्यांची विक्री झाली आहे.

Mumbai APMC : बटाटा उत्पादकांना अच्छे दिन..! आषाढीच्या तोंडावर महिन्याची आवक तीन दिवसांमध्ये, दराचे काय ?
आषाढी वारी निमित्ताने बटाट्याला अधिकची मागणी राहिली आहे
Follow us on

मुंबई : (Maharashtra) राज्यात साजरे होणारे सण, उत्सव आणि धार्मिक कार्यक्रम यावरही शेतीमालाचे दर अवलंबून आहे. इतर वेळी 20 ते 25 रुपये किलो विकला जाणाऱ्या बटाट्याने (Ashadhi Wari) आषाढी वारीच्या तोंडावर चांगलाच भाव खाल्ला आहे. (Mumbai APMC) मुंबई एपीएमसी मध्ये तर महिन्यात होणारी बटाट्याची आवक ही केवळ तीन दिवसांमध्ये झालेली आहे. शिवाय मागणी अधिक असल्याने दरही टिकून राहिले आहेत. तीन दिवसांमध्ये तब्बल 150 गाड्यांमधून बटाट्याची आवक झाली आहे. दीड हजार टन बटाट्याची आवक होऊन देखील दिवसाला 52 गाड्यातील बटाट्यांची विक्री झाली आहे. 35 ते 40 रुपये किलो अशा दराने किरकोळ बाजारपेठेत बटाट्याची विक्री झाली. मात्र, आषाढीच्या पूर्वसंध्येला दरात काहीशी घसरण झाली होती.

म्हणून मागणी अन् दरही राहिले टिकून

बटाटा हे बारामाही बाजारात असते. मात्र, आषाढी वारीच्या दिवशी उपासामुळे बटाट्याच्या मागणीत वाढ होते. यंदा तर दरवर्षीपेक्षा वाढ मागणी वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळेच तीन दिवसांमध्ये व्यापाऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात बटाट्याची खरेदी केली होती. मोठ्या प्रमाणात खरेदी करुन देखील दिवसाकाठी 50 ते 55 गाड्यातील बटाट्यांची विक्री झाली आहे. यंदा मागणी आणि पुरवठा याचा मेळ लागल्याने ना ग्राहकांना अधिकच्या दरात खरेदी करावे लागले ना शेतकऱ्यांना या पिकातून झळ बसलेली नाही.

कसे राहिले दराचे चित्र?

बाजारपेठेत बटाट्याची आवक वाढली असली तरी दरावर त्याचा परिणाम झाला नाही. शिवाय या काळात दर टिकून राहिल्याने शेतकऱ्यांनाही याचा फायदा झाला आहे. ठोक बाजारात 22 ते 25 रुपये किलो असा बटाट्याला भाव मिळाला तर किरकोळ विक्रीमध्ये ग्राहकांना 35 रुपये किलोने बटाटा खरेदी करावा लागला. बटाटा दराने समतोल साधल्याने ना शेतकऱ्यांचे नुकसान झाले ना ग्राहकांना दराचा फटका बसला. आषाढी वारी दिवशी घरोघरी एक ते दीड किलो आणि हॉटेल व्यवसायिक हे मोठ्या आकाराची बटाटो खरेदी करातात.

हे सुद्धा वाचा

परराज्यातूनही आवक

केवळ राज्यातील विविध भागातून नाहीतर मुंबई बाजारपेठेत मध्य प्रदेश, गुजरात आणि उत्तर प्रदेशातून आवक होते. शिवाय ज्योती बटाटा वाणाला अधिकची मागणी आहे. आकाराने मोठा असलेल्या बटाट्यालाच व्यावसायिक प्राधान्य देतात. एकीकडे निसर्गाचा लहरीपणा सुरु असतानाच दुसरीकडे बटाटा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे.